Sunday, November 1, 2015
किल्ले भोरगिरी
उद्या कधी काळी सन्यास घ्यायची, भुमिगत व्हायची किंवा कुठं अज्ञातवासात जावून अज्ञातानंद लुटायची वेळ आली किंवा वैराग्य धारण करुन एखादा बोधग्रंथ लिहायचं ठरलं तर किल्ले भोरगिरी फुल अॅन्ड फायनल.
हाये काय... भिमाशंकरच्या पायथ्याला इन मीन 150 मिटर उंचीचा छोटेखाणी डोंगरी किल्ला. वाटही सोपी. पण लोकेशन सोपं नाही... मनावर गारुडच करुन टाकतं. शिवशंकराच्या गुहेत थंडाव्याला बसलं की समोर सारं भोरगिरी पसरलेलं. भिमाशंकराच्या डोंगरावरुन भिमा गावात उतरतेय, भिरगिरी किल्ल्यावरुनही एक नदी उगम पावून कासराभर अंतरावर भिमेला मिळतेय. त्यावर बांधलेले बंधारे. तो पाणीसाठा आणि साऱ्या आसमंतात खिळून राहीलेला प्रचंड उल्हासित थंडावा. डोळे उघडे ठेवले तरी ध्यानस्त आणि मिटले तरी ध्यानस्त. अजून काय पाहिजे. किल्ल्यावर आणि पोटाशीही लेणी आहेत. नवव्या शतकात त्यांची निर्मिती झाली असे माणले जाते. हा किल्ला मुघलांच्या आणि शिवरायांच्याही साम्राज्यात होता.
भोरगिरी गाव मोठं वैशिष्ट्यपुर्ण आहे. खेड तालुक्याचं पश्चिम टोकाचं हे अखेरचं गाव. या ठिकाणी 33 कोटी देवांची भिमासुराला मारण्याबाबतची बैठक झाली. त्यात शिवशंकराने ही जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि आत्ता जेथे भिमाशंकराचे मंदीर आहे तेथे त्याला मारला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक पवित्र ठिकाण. पण त्याचे दर्शन सत्कारणी लागायचे असेल तर त्याआधी भोरगिरी गावातील शंकराच्या मुख्य मंदीरात येवून दर्शन घ्यावे लागते आणि मग भिमाशंकराचे दर्शन घ्यावे लागते, असे पुराणात लिहीलंय असं इथले समाजबंधू सांगतात. या मार्गे पायी भिमाशंकरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पुरंदरच्या तहातील किल्ले
शिवरायांनी पुरंदरच्या तहात 11 जून 1665 रोजी स्वराज्यातील 23 किल्ले व त्याभोवतीचा सात लाख होनाचा प्रदेश मिर्झाराजा जयसिंगाच्या... मुघलांच्या हाती दिला. ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक, नैसर्गिक दृष्ट्या हे किल्ले आणि त्याभोवतीचा प्रदेश अतिशय महत्वपूर्ण आहे. आवर्जून पहावा अभ्यासावा असा.
यातील अनेक किल्ल्यांची नावे सोडली तर इतर माहिती विकिपीडियावरही नाही. जुने इतिहास कम धर्मग्रंथ प्रत्येकाच्या हाती लागतील आणि पचतील असेही नाही. आमचे यातील पहिले 11 अनुभवून झालेत. अजून 12 बाकी आहेत. येत्या दोन वर्षात नक्की like emoticon
1) पुरंदर, 2) सिंहगड, 3) तुंग, 4) तिकोना, 5) लोहगड, 6) विसापूर, 7) मनरंजन (राजमाची), 8) कर्नाळा, 9) प्रबळगड - मुरंजन, 10) रोहिडा, 11) वसंतगड,
12) अंकोला, 13) कोहोज, 14) खिरदुर्ग (सागरगड), 15) नंगगड, 16) नरदुर्ग, 17) पळसगड, 18) भंडारगड, 19) मानगड, 20) मार्गगड, 21) माहुलीगड, 22) रुद्रमाळ, 23) सोनगड
दुधसागर, गोवा-कर्नाटक
दुधसागर. गोवा - कर्नाटक सिमेवरील अतिभव्य, सर्वांगसुंदर, नयनरम्य धबधबा. जन्नत नाही तर दुसरं काय. दोन दिवसांपुर्वी सहकुटुंब सहपरिवार गेलो. मनसोक्त अंगावर घेतला. आंतरबाह्य घुसळून निघालो.
अर्णवला सोबत घेवून दुधसागरच्या तळाच्या तळ्यात मस्त पोहलो. अर्णवच्या भाषेत सांगायचं तर मस्ती घातली. उताणे पोहत वरुन कोसळणारा संपूर्ण धबधबा पाहण्याची मजा औरच. चेन्नई एक्स्र्पेस चित्रपटामुळे हा धबधबा घराघरात पोचलाय. पण त्याची खरी मजा दुरचित्रवाणी पेक्षा स्वानुभुतीतच आहे. तो आवाज, खळाळ, शिट्ट्या पाखरांचा गलबलाट... तो मस्त अविरत कोसळतोय आणि संपन्नतेनं गच्च भरलेल्या अभयारण्यातील प्रत्येक चराचर त्याला आपापल्या नादात मस्त साथसंगत करतेय. अफलातून मैफिल...
अनेक दिवसांपासून हा ट्रेक करायचं चाललेलं. पण हुकायचा. दरम्यान गेल्या दोन वर्षात हे ठिकाण फॉरेस्ट वाल्यांनी पिंजऱ्यात टाकलंय. रेल्वे रुळावरुन धबधब्याकडं जाणारी जी वाट होती, ती बंद करण्यात आलीये. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. महावीर अभयारण्यात फक्त मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश दिला जातोय. यामुळे लोहमार्गावरुन दुधसागरच्या पुर्वीच्या मुसाफिरीला लगाम बसलाय.
अभयारण्यात खासगी वाहनांना प्रवेशबंद आहे. त्यासाठी पायथ्याच्या गावातून स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 400 रुपये शुल्क घेतात. अभयारण्यात प्रवेशाचे 30 रुपये तिकीट. शिवाय लाईफ जॅकेट बंधनकारक आहे. त्याचेही 30 रुपये शुल्क आहे. म्हणजे 500 रुपये प्रतिव्यक्ती खर्च आहे. पण धबधब्यावर पोचलं की उरात उतरणारी जन्नत लाख मोलाची आहे.
यंदा पाऊस कमी झालाय. त्यामुळे धबधबाही पुर्वीच्या जोशात नाही. नेहमी नोव्हेंबरपासून पर्यटकांना तो खुला होता. यंदा महिनाभर आधीच सुरवात झालीये. दररोज 250 ते 300 जीप (प्रतिजीप 7-8 जण) भरुन धबधब्यावर जात आहेत. आता पुढील सहा महिने हे ठिकाण असेच ओसंडून वाहत राहील. पाण्याने, गर्दीने आणि आनंदाने !
(गेल्या वर्षभरात किंवा नुकतंच आपल्यातलं कुणी जर रेल्वे रुळाच्या रस्त्याने दुधसागरला चालत गेलं असेल तर अनुभव, माहिती व कसं काय मॅनेज करायचं ते सांगा. इंटरनेटवर या ट्रेकविषयी उपलब्ध असलेली सगळी माहिती जुनी आहे. तिच्या आधारे उद्योग करायला गेल्यास तोंडावर पडायची शक्यता अधिक. मला त्या मार्गेहा अफलातून ट्रेक करायचा आहे...)
- संतोष डुकरे
Tuesday, January 6, 2015
मध्य महाराष्ट्र - महाराष्ट्रातील किल्ले वर्गवारी
पुणे जिल्हा
- जुन्नर तालुका
१) शिवनेरी
२) जिवधन
३) चावंड
४) हडसर
५) नारायणगड
६) निमगिरी
७) हनुमंतगड
८) दुर्ग
९) ढाकोबा
१०) सिंदोळा
११)
१२)
- खेड तालुका
१) चाकणचा भुईकोट
२) भोरगिरी
- शिरुर तालुका
१)
२)
आंबेगाव
१)
२)
मावळ
१) लोहगड
२) विसापूर
३) तुंग
४) तिकोना
५) राजमाची
६) ढाक बहिरी
७)
८)
मुळशी
१)
२)
हवेली
१) सिंहगड
२)
भोर
१) राजगड
२)
वेल्हे
१) तोरणा
२)
पुरंदर
१) पुरंदर
२) वज्रगड
३) मल्हारगड
४) जाधवराव गढी
बारामती
१)
२)
इंदापूर
१)
२)
दौंड
१) दौलतमंगळ उर्फ भुलेश्वर
---------------------
- जुन्नर तालुका
१) शिवनेरी
२) जिवधन
३) चावंड
४) हडसर
५) नारायणगड
६) निमगिरी
७) हनुमंतगड
८) दुर्ग
९) ढाकोबा
१०) सिंदोळा
११)
१२)
- खेड तालुका
१) चाकणचा भुईकोट
२) भोरगिरी
- शिरुर तालुका
१)
२)
आंबेगाव
१)
२)
मावळ
१) लोहगड
२) विसापूर
३) तुंग
४) तिकोना
५) राजमाची
६) ढाक बहिरी
७)
८)
मुळशी
१)
२)
हवेली
१) सिंहगड
२)
भोर
१) राजगड
२)
वेल्हे
१) तोरणा
२)
पुरंदर
१) पुरंदर
२) वज्रगड
३) मल्हारगड
४) जाधवराव गढी
बारामती
१)
२)
इंदापूर
१)
२)
दौंड
१) दौलतमंगळ उर्फ भुलेश्वर
---------------------
कोकण - महाराष्ट्रातील किल्ले वर्गवारी
ठाणे
१) किल्ले डहाणू
२) तारापूरचा किल्ला
३) किल्ले शिरगाव
४) माहिम किल्ला (केळवे स्टेशनजवळ)
५) केळव्याचा किल्ला
६) केळवे पाणकोट
७) दांडा किल्ला
८) भवानगड
९) दातिवरे किल्ला
१०) अर्नाळा
११) वसई किल्ला
१२) धारावी किल्ला
१३) घोडबंदर किल्ला
१४) ठाण्याचा किल्ला
१५) दुर्गाडीचा किल्ला
१६) बेलापूरचा किल्ला
-----------------------------
मुंबई (जिल्हा व उपनगर)
१) वर्सोवा फोर्ट
२) बांद्र्याचा किल्ला
३) माहीमचा किल्ला (वरळीच्या पुढे)
४) वरळीचा किल्ला
५) काळा किल्ला उर्फ ब्लॅक फोर्ट
६) रिवा किल्ला
७) शीवचा किल्ला (सायनचा किल्ला)
८) शिवडीचा किल्ला
९) माझगावचा किल्ला
१०) डोंगरीचा किल्ला
११) फोर्ट सेंट जाॅर्ज
१२) बाॅम्बे कॅसल (बाॅम्बे फोर्ट)
------------------------------------
रायगड जिल्हा
१) घारापुरीचा किल्ला
२) मनरंजन कोट (रेवसची गढी)
३) श्रीवर्धनगड (मांडवी गढी)
४) थळचा किल्ला
५) किल्ले खांदेरी
६) किल्ले उंदेरी
७) कुलाबा किल्ला (अलिबाग)
८) सर्जेकोट (कुलाब्याजवळ)
९) हिराकोट (अलिबाग)
१०) राजकोट (अलिबागजवळ चौल)
११) आगरकोट (अलिबागजवळ चौल)
१२) रेवदंड्याचा किल्ला
१३) कोलईचा किल्ला
१४) पद्मदुर्ग (जंजीराजवळ)
१५) सामराजगड (जंजीराजवळ)
१६) जंजीरा
------------------------------------------
रत्नागिरी जिल्हा
१) बाणकोटचा किल्ला
२) सुवर्णदुर्ग
३) कनकदुर्ग
४) फत्तेगड
५) गोवागड
६) गोपाळगड
७) जयगड (गणपतीपुळ्याजवळ)
८) विजयगड (जयगड शेजारी)
९) रत्नदुर्ग (रत्नागिरी)
१०) पूर्णगड (पावस)
११) यशवंतगड
१२) आंबोळगड
१३) राजापूरची वखार
------------------------------------------
सिंधुदुर्ग जिल्हा
१) विजयदुर्ग
२) देवगड
३) सिंधुदुर्ग
४) पद्मगड
५) राजकोट
६) सर्जेकोट
७) भरतगड
८) भगवंतगड
९) निवती
१०) वेंगुर्ला भुईकोट
११) यशवंतगड (रेडी)
१२) तेरेखोलचा किल्ला (गोवा बाॅर्डर)
----------------------------------------------------
Tuesday, June 17, 2014
Subscribe to:
Posts (Atom)






























