सिंधुदुर्ग किल्याच्या रक्षणासाठी ज्याप्रमाणे नालाकृती रचनेत पुरक किल्ल्यांची रचना आहे, तशीच रचना घाटाखालचा सुधागड आणि त्याभोवती घाटावरील घनगड, तैलबैैल, कोरीगड यांचीही आहे. घनगड हा सुधागडचा सर्वात जवळचा पहारेकरी. अगदी समोरासमोर आहेत... पण मध्ये खोल दरी आहे. सुधागड पाहिल्यानंतर हा किल्ला पाहण्याची मजा काही वेगळीच.
वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे हा टेहाळणीचा अप्रतिम किल्ला आहे. सर्वसाधारणपणे आसपासच्या डोंगररांगाहून अधिक उंचीच्या व स्वतंत्र घेरा असलेल्या डोंगरावर किल्ले बांधले जातात. हा किल्ला त्याला अपवाद आहे. या किल्ल्याला जोड असलेला डोंगर याच्याहूनही कासरा दोन कासरा उंच आहे. पण हे स्थानच वेगळे आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय घुसणार नाही.













No comments:
Post a Comment