जनरली अशा बाबी कुणी कुणाला सांगत नसतं. पण आमच्या चेतन नलावडेने विषय काढला म्हणून रहावलं नाही.
आठ पंधरा दिवसापूर्वी पानशेत ते रायगड ट्रेकला भिकाजी दादांनी Bhikaji Chavanडीकॅथेलॉनमध्ये खास ट्रेकिंगसाठी साडेतीन हजार खर्चून घेतलेले शुज घातले. पण पहिल्या दगडावर पाय ठेवला आणि ट्रेकिंगचा आणि आमचा काही संबंध नाही हे त्या दोन्ही बुटाडांनी जाहिर केलं. परिणामी पुढचा संपूर्ण अडीच दिवसाचा अतिशय अवघड स्थितीतला ट्रेक प्रत्येक पाऊल दहादा विचार करुन तपासून टाकण्याची वेळ आली त्यांच्यावर. त्या बुटांचा दादांनी एवढा धसका घेतला की अनेकदा हात पाय टेकवून उतरले.
हीच कथा चार दिवसापुर्वीच्या रायरेश्वर केंजळगड ट्रेकची. नशीब त्यावेळी आमच्या जेष्ठ ट्रेकर सहकाऱ्यांने दोन तीन जनांनी एकाच वेळी घेतलेले साडेतीन चार हजार रुपयांचे ट्रेकिंग साठीचे शुज पावसाळ्यात उपयोगाचे नाहीत, पावलोपावली घसरुन पडण्याची शक्यता आहे, असे जाहिर केले. आणि मग आमच्या रमेशजींनी Ramesh Uttamrao Jadhav मी दरेक ट्रेकला घसा कोरडा पडेपर्यंत माझ्या शुजचे (अॅक्शन ट्रेकिंग) घसा कोरडा करेपर्यंत करतो ते कौतुक सिरीयसली घेतली आणि नवे कोरे शुज ताफ्यात दाखल केले.
या ट्रेकला माझ्यासह (कारण माझे शुज अती वापराने अकाली वार्धक्याकडे झुकलेत) सहकारी किमान एकदा तरी घसरुन पडले. जेष्ठ ट्रेकर तर एका नवाट गृप ला पायऱ्या कशा चढाव्यात याचं प्रात्यक्षिक दाखवतानाच पाय घसरुन केंजळगडाच्या तीन पायऱ्या ढुंगाडावर टून्नूकटून्नक आदळत गेले. पुन्हा पाऊस झाल्यावर त्यांनी गिरकी घेत पसरण घेतली तेव्हा त्यांची मजा पाहता पाहता माझीही गाडी उराळी झाली. उरलेल्या युवा उद्योजकांनी पडापडीचा अनुभव घेतल्यावर पार्श्वभागाची घसरगुंडी करुन उतरणे पसंत केले.
पण.... या सर्व पडझडीत संपूर्ण ट्रेकमध्ये फक्त एक माणूस एकदाही घसरला नाही. तो म्हणजे अॅक्शन ट्रेकिंग वाले रमेश जाधव. यावरुन ट्रेकिंग शुजचे महत्व जाणकारांनी समजून घ्यावे. रमेशजी आता अॅक्शन ट्रेकिंग शुजचे ब्रॅन्ड अॅबेसेडर झालेत. केंजळगड उतरत होतो तेव्हा अनेक पहिलारु, नवखे ट्रेकर चप्पल, कॅन्व्हास शुज किंवा ते ही तुटून फाटून गेल्यावर जखमी अवस्थेत फक्त सॉक्स घालून ट्रेकिंगची रिस्क घेताना भेटले. त्यांना कोणते शुज घेणार... असे पाचदा तरी घोकून घेतलं आम्ही... शेवटी सिर सलामत तो पगडी पचास. नाही का...
(चेतन Chetan Nalavade लवकरच स्वतःच्या सेफ्टी इक्विपमेंट कंपनीमार्फत खास ट्रेकिंगसाठीचे नवीन शुज लॉंच करतोय. मित्रा शुभेच्छा.. टेस्टिंग रिपोर्ट तुला देईलच wink emoticon )

No comments:
Post a Comment